Monday, July 6, 2026
Homeगुन्हाधक्कादायक - मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

धक्कादायक – मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

धक्कादायक – मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

Oplus_131072

<img class

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित बाळू काळू राठोड (रा. कु-हाड तांडा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील संशयित बाळू काळू राठोड याने २३ वर्षीय पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले. तसेच तुझ्या मुलीचे काहीतरी बरे-वाईट करेन अशी धमकी देत त्याने पीडितेला पाचोऱ्यातील एका हॉटेलवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला ‘जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेल अशी धमकी दिली. त्या भीतीपोटी पीडितेला त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील ‘श्रीमंत हॉटेल’वर नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पिंपळगाव हरेश्वर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आरोपी बाळू काळू राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या