Thursday, February 12, 2026
Homeगुन्हासोबत फिरायला चल अस म्हणत अल्पवयीन मुलीलावर सुरत येथे अत्याचार!

सोबत फिरायला चल अस म्हणत अल्पवयीन मुलीलावर सुरत येथे अत्याचार!

सोबत फिरायला चल अस म्हणत अल्पवयीन मुलीलावर सुरत येथे अत्याचार!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सोबत फिरायला चल असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल रमेश राठोड (२५, रा. पिंप्राळा) याने अत्याचार केला. हा प्रकार ३० जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड याने फिरायला जायच्या बहाण्याने २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. तेथे ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक भूषण कोते करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या