बांधकाम साईटवरून लोखंडी दरवाजाची चोरी ; गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील उस्मानिया पार्क मधील एका बांधकाम साईटवरून ७० किलो वजनाचा लोखंडी दरवाजा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे संजय रात्या बारेला हे तिथे वॉचमन म्हणून कार्यरत आहे. २ फेब्रुवारी रोजी बांधकाम साईट वरून ८ हजार रुपये किमतीचा हा लोखंडी दरवाजा अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार उमेश भांडारकर तपास करत आहेत.

