Saturday, March 28, 2026
Homeचाळीसगावहिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
चाळीसगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                : हिरापूर ते नायडोंगरी दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च रोजी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास हिरापूर-नायडोंगरी दरम्यान खांबा क्रमांक ३१८/२८ ते ३१९/२ जवळ हा प्रकार घडला. संबंधित इसम कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.मृत इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, रंग काळासावळा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, नाक सरळ, केस काळे-पांढरे, दाढी पांढरी व बारीक वाढलेली. अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट, पांढऱ्या-करड्या रंगाची नाईट पॅन्ट, उजव्या हातात काळ्या रंगाचा करदोडा व पांढऱ्या धातूचे कडे होते.या घटनेचा पुढील तपास हवालदार बाळासाहेब पवार करीत असून, संबंधित इसमाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या