शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकावर धारदार चाकूने वार; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने कमल भरत लोंढे (वय ४५, रा. राजीवगांधी नगर) यांच्यावर धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता राजीवगांधी नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या कमल लोंढे या दि. २० रोजी सायंकाळी मुलीसोबत खदाणकडे जात होत्या. तयवेळी संशयित उषाबाई हातांगळे यांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी कमल लोंढे यांनी तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करीत आहे याचा जाब विचारला. त्याच्या राग आल्याने तिघांनी मायलेकीसोबत वाद घातला. या वादातून संशयित शुभम हातांगळे यांने त्याच्या हातील धारदार चाकूने लोंढे यांच्यावर वार केला. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, कमल लोंढे यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित उषाबाई लक्ष्मण हातांगळे, सोनी लक्ष्मण हातांगळे, शुभम लक्ष्मण हातांगळे (तिघ रा. राजीव गांधी नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना हेमंत कळसकर हे करीत आहे.

