Saturday, April 25, 2026
Homeगुन्हाबऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर डिव्हिजन आणि जिल्हा पोलीस गस्त पथकाने पकडले वाळूचे...

बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर डिव्हिजन आणि जिल्हा पोलीस गस्त पथकाने पकडले वाळूचे डंपर.

बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर डिव्हिजन आणि जिल्हा पोलीस गस्त पथकाने पकडले वाळूचे डंपर.

यावल पोस्टेला गुन्हा दाखल. राजकारणात आणि अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     दि.२५
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर तथा यावल चोपडा रस्त्यावर वढोदे गावाजवळ किनगाव कडून यावल कडे येणारे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर जिल्हा पोलीस गस्त आणि डिव्हिजन पोलीस गस्त पथकाने पकडून गुन्हा दाखल केल्याने अवैध वाळू ( अवैध गौण खनिज ) वाहतूकदारांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

शनिवार दि.२५ रोजी सकाळी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस आणि डिव्हिजन पोलीस गस्त पथकाने वडोदे गावाजवळ अवैध गौणखनिज वाहतूक करणारे डंपर क्र.MH-14-CP 1915 ( चालक मयूर पद्माकर कोळी वय २२ रा.रिधूर तालुका जळगाव ) पकडून यावल पोस्टेला जमा करून गुना नंबर १२६ / २०२६ नोंद केला पुढील तपास डी.वाय. एस.पी बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,पीएसआय अनिल महाजन हे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या यंत्रणेला राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणात असल्याने महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कारवाई करताना आणि अनेक कायदेशीर अडचणी येत असल्याचे शासकीय वर्तुळात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या