Sunday, August 23, 2026
Homeगुन्हालाचलुचपत विभागाची कारवाई : ४ हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहात जेरबंद

लाचलुचपत विभागाची कारवाई : ४ हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहात जेरबंद

लाचलुचपत विभागाची कारवाई : ४ हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहात जेरबंद !

चाळीसगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – खरेदीखत व सुची क-०२ च्या प्रमाणित नकला देण्यासाठी लाच मागणाऱ्या खासगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (धुळे) सापळा रचून कारवाई केली. सुनिल शिवदास निकम (वय ४७, रा. आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) यास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून त्यांच्या सर्वे नं. ४/१ व ४/२ मधील प्लॉट नं. १२ या बिनशेती प्लॉटच्या खरेदीखत व सुची क-०२ च्या प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी ते ३० एप्रिल रोजी चाळीसगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुनिल निकम उर्फ नाना यांनी संबंधित कागदपत्रांच्या नक्कल देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागितली. यातील ५ हजार रुपये त्यांनी तात्काळ स्वीकारले तर उर्वरित ४ हजार रुपये नक्कल देताना देण्याची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानुसार विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी करून सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदारास कागदपत्रांच्या नकला देत ४ हजार रुपये स्वीकारताना पथकाने त्यास रंगेहात पकडले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अ अंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांचा समावेश होता.दरम्यान शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या