Wednesday, May 6, 2026
Homeगुन्हातालुक्यात गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या !

तालुक्यात गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या !

तालुक्यात गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या !

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील शिंदी व पिंपरखेड (गोरखपूर) येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. दोन्ही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पिंपरखेड (गोरखपूर) येथील अनिल भिकन राठोड (वय ३९) हे विसापूर तांडा येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्यापूर्वी उघडकीस आली.दुसऱ्या घटनेत शिंदी येथील माधव शत्रुधन गरूड (वय ५७) यांनी सोमवारी सकाळी ७ वाजण्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.या दोन्ही घटनांप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या