२० दिवसांपासून मायलेक बेपत्ता; पोलीस ठाण्यात नोंद

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील तरवाडे पेठ येथून गेल्या २० दिवसांपासून मायलेक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सोनाबाई दशरथ मोरे (वय ३०) व त्यांची मुलगी खुशी दशरथ मोरे (वय १२), रा. तरवाडे, ता. चाळीसगाव या दि. १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपूर्वी कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेल्या असल्याची माहिती आहे.नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्या आढळून न आल्याने पभाबाई दिलीप सोनवणे, रा. तरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.पोलीस अधिक तपास करत असून संबंधित मायलेकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना कुठलीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

