तरुणीची गंभीर फिर्याद : ब्लॅकमेलिंग, मारहाण व आर्थिक शोषणाचा आरोप !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने शहर पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. आरोपी यश महेंद्र जैन (रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) याच्यावर ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती, मारहाण आणि लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.फिर्यादी तरुणी सध्या बाहेरगांवी शिक्षण असून, २०२२ मध्ये ओळख झाल्यानंतर आरोपीशी मैत्री झाली होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,आरोपीने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे तरुणीचे खाजगी फोटो व व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले.यानंतर आरोपीने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला वारंवार भेटण्यास भाग पाडले. तसेच शारीरिक संबंधांची मागणी करत दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विरोध केल्यावर आरोपीने मारहाण, शिवीगाळ व अश्लील वर्तन केल्याचाही आरोप आहे.तसेच आरोपीने धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादीकडून सुमारे ₹8,12,000 रोख व ऑनलाइन तसेच सुमारे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने उकळल्याचे समोर आले आहे.घटनेदरम्यान आरोपीने तरुणीचा टॉप फाडून तिला अर्धनग्न अवस्थेत गाडीतून उतरवले, तसेच तिच्या पर्समधून पैसेही जबरदस्तीने घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बदनामी करण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७(अ) अंतर्गत कारवाई सुरू आहे या जैन ने अजुन किती मुली सोबत अशे प्रकार केले आहे पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा रंगली आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

