Sunday, May 10, 2026
Homeचाळीसगावहिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये शॉर्टसर्किट आग आटोक्यात, वीजपुरवठा दोन तास...

हिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये शॉर्टसर्किट आग आटोक्यात, वीजपुरवठा दोन तास खंडित

हिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये शॉर्टसर्किट आग आटोक्यात, वीजपुरवठा दोन तास खंडित

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                हिरापूर रोडवरील १३२ केव्ही सब स्टेशन येथे रविवार दि. १० मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. सब स्टेशनमधील आगीच्या ठिणग्या खाली असलेल्या गवतावर पडल्याने आग वेगाने पसरली. त्यानंतर कंपाउंडच्या बाहेर ठेवलेल्या लाकडालाही आग लागून मोठ्या प्रमाणात धूर व ज्वाळा उसळल्या.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रशांत राजपूत यांनी तात्काळ चाळीसगाव नगरपरिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा दीड ते दोन तासांसाठी बंद करण्यात आला होता. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत पाटील, गजेंद्र विसपुते, माजी उपसरपंच मुराद पटेल, ग्रामपंचायत कर्मचारी किरण देसले तसेच अमन पटेल यांनी मदतकार्य केले.या वेळी उपस्थित नागरिकांनी चाळीसगाव नगरपरिषद फायर फायटर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या