Friday, May 15, 2026
Homeगुन्हाडॉक्टरांच्या दवाखान्याच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरी

डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरी

डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरी

 

-चाळीसगाव : शहरातील लक्ष्मी नगर परिसरात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बांधकामातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७४ हजार रुपयांची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याबाबत सौ. राखी कपिल लड्डा (वय ३९, व्यवसाय डॉक्टर, रा. लक्ष्मी नगर, शिवाय लॅबजवळ, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे पती डॉ. कपिल अशोक लड्डा यांचे दवाखान्याचे बांधकाम लक्ष्मी नगर परिसरात सुरू असून इलेक्ट्रिक फिटिंगचे काम मोसीन शेख या ठेकेदाराकडे देण्यात आले होते.फिर्यादीनुसार, ७ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत बांधकामस्थळी सर्व साहित्य सुरक्षित होते. मात्र ८ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजता बांधकाम मजुरांनी बिल्डिंगमधील फिटिंग केलेली कॉपर वायर चोरी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर डॉ. कपिल लड्डा यांनी पत्नी राखी लड्डा यांना माहिती दिली. दोघांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर कॉपर वायर चोरी झाल्याचे समोर आले.यानंतर इलेक्ट्रिक फिटिंग ठेकेदार मोसीन शेख यांना बोलावून चोरीस गेलेल्या साहित्याची पाहणी करण्यात आली. यात विविध आकारातील RR CABLE कंपनीच्या कॉपर वायरचे एकूण ७४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.चोरट्यांनी बांधकाम सुरू असल्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेत ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या