Sunday, August 23, 2026
Homeचाळीसगावहादरले! खरजई येथे माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

हादरले! खरजई येथे माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

हादरले! खरजई येथे माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील खरजई गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून माकडाच्या चाव्यामुळे ३ वर्षीय अनुश्री विशाल मराठे हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगल परिसरात पाणी व अन्नटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे माकडांचे कळप ग्रामीण भाग व शहरांकडे स्थलांतर करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खरजई गावातही गेल्या काही दिवसांपासून माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.याच दरम्यान, एका माकडाने अनुश्री मराठे या चिमुकलीवर हल्ला करून तिला चावा घेतल्याची घटना घडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.गावात वाढत्या माकडांच्या उपद्रवाबाबत ग्रामपंचायतीने वन विभागाला पूर्वसूचना दिली होती का? तसेच यावर कोणती उपाययोजना करण्यात आली होती का? असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने माकडांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या