पॉक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी चाळीसगावातून जेरबंद

गुन्हे शोध पथकाची कारवाई; राहता पोलिसांच्या ताब्यात दिला आरोपी
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी राहता पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १६८/२०२६ मधील पॉक्सो प्रकरणातील फरार आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली.डीएनएस कलम ६४ (२) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कलम ४, ६ व ८ अन्वये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर ईश्वर केदार (रा. खरजई, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली.त्यानंतर आरोपीस राहता पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील, विलास पवार व बाबासाहेब खरात यांचा समावेश होता.

