Monday, July 6, 2026
Homeगुन्हाअंगणात खेळणाऱ्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार; परिसरात संतापाची लाट !

अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार; परिसरात संतापाची लाट !

अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार; परिसरात संतापाची लाट !

Oplus_131072

<img class

 

आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा; डीवायएसपींकडून तपास सुरू

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील एका गावात तीन वर्षीय चिमुकलीसोबत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संशयिताविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉकसो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास त्या घरकामात व्यस्त असताना मुलगी घरासमोरील अंगणात खेळत होती. काही वेळानंतर मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातील बाथरूममध्ये मुलगी रडत असल्याचे आढळून आले.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मुलीच्या कपड्यांची स्थिती संशयास्पद होती. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधितांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले असून, वैद्यकीय अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

या प्रकरणाचा तपास डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या