Wednesday, May 27, 2026
Homeचाळीसगावदिल्ली–मेरठ आर्मी कुस्ती स्पर्धेत चाळीसगावच्या जवानाचा डंका; मेजर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली...

दिल्ली–मेरठ आर्मी कुस्ती स्पर्धेत चाळीसगावच्या जवानाचा डंका; मेजर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ विजेता

दिल्ली–मेरठ आर्मी कुस्ती स्पर्धेत चाळीसगावच्या जवानाचा डंका; मेजर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ विजेता

चाळीसगाव :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दिल्ली–मेरठ येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित आर्मी इंटर युनिट कुस्ती स्पर्धेत चाळीसगावचे सुपुत्र व भारतीय सैन्यातील अधिकारी मेजर नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. कठोर मेहनत, शिस्तबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर संघाने संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत अंतिम फेरीत विजय मिळवला.स्पर्धेदरम्यान मेजर नितीन पाटील यांनी केवळ प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणूनच नव्हे, तर प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.विजयानंतर संघाला मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. हा सन्मान केवळ एका संघाचा नसून मराठी मातीच्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव मानला जात आहे. “वीर मराठा” परंपरेला साजेशी कामगिरी करत संघाने आर्मीच्या क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.या यशामागे खेळाडूंच्या अथक परिश्रमाबरोबरच मेजर नितीन पाटील यांचे प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन आणि खेळाडूंना दिलेली प्रेरणा महत्त्वाची ठरली. त्यांच्या या यशामुळे चाळीसगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चाळीसगावहुन धर्मभूषण बागुल, वर्धमान धाडीवाल, लक्ष्मण बागुल, दिलीप घोरपडे, गणेश गवळी, मुराद पटेल, गौतम आरक, व वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परिवाराने कौतुकास्पद अभिनंदन केले आहे तसेच देशसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही मराठी जवानांनी आपली ताकद सिद्ध केली असून, मेजर नितीन पाटील आणि त्यांच्या संघाची ही कामगिरी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.मेजर नितीन पाटील व संपूर्ण विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! दिल्या आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या