Friday, May 29, 2026
Homeचाळीसगावबकरी ईदच्या दिवशी पोहण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

बकरी ईदच्या दिवशी पोहण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

बकरी ईदच्या दिवशी पोहण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

 

चाळीसगाव,     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              बकरी ईदच्या सुट्टीसाठी शहरातील घाट रोड परिसरातील घरी आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत तरुणाचे नाव मोईन जाकीर झारेकरी (वय २०) असे असून तो मालेगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. बकरी ईदच्या निमित्ताने तो सुट्टीसाठी गावी आला होता. चार मित्रां सोबत धरणात पोहण्यासाठी दुपारी सुमारे २ वाजेच्या दरम्यान मोईन हा आपल्या मित्रांसह धरण परिसरात गेला होता. त्याच्यासोबत शेख मुनीब (वय २०), रेहान सय्यद (वय २०), अल्तमाश शेख (वय २४), जायद शेख चार मित्र उपस्थित होते.धरणात उतरल्यावर मोईनचा पाण्याचा अंदाज चुकल्याने तो खोल पाण्यात गेला व बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व मित्रांनी शोधमोहीम सुरू केली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह गाळात अडकलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.घटनास्थळी मदतकार्यात नगरसेवक अनिल ठाकरे, संभा जाधव, फकीरा मिर्झा, बाबा ठेकेदार, मुकेश चौधरी, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, रोशन जाधव यांच्यासह

सामाजिक कार्येकर्ते

वसीम मास्टर,अकरम मिर्झा,नासिर शेख,शाहिद मिर्झा घटनास्थळी मदत कार्यासाठीअनेक मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते

या दुर्दैवी घटनेमुळे झारेकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. बकरी ईदच्या आनंदावर या घटनेने विरजण पडले आहे.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या