Sunday, May 31, 2026
Homeगुन्हाम्हैस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

म्हैस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

म्हैस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली असून म्हैस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडजी (ता. भडगाव) येथील शेतकरी बुधा बबन सोनवणे (वय ४०) हे शनिवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत म्हैस विक्रीसाठी आले होते. त्यांनी आपली लाल रंगाची सिटी हंड्रेड मोटारसायकल (एमएच-१९ डीके-६९२८) बाजार समिती परिसरातील एका ठिकाणी उभी करून म्हैस उतरविण्याच्या कामासाठी गेले होते.दरम्यान, सकाळी सुमारे १० वाजता परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. यानंतर त्यांनी बाजार समिती परिसरासह रेल्वे स्थानक, बसस्थानक, भडगाव रोड, हिरापूर रोड आणि मालेगाव रोड परिसरात वाहनाचा शोध घेतला. मात्र दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही.चोरीस गेलेल्या मोटारसायकलीची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असून अज्ञात चोरट्याने सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी बुधा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिपक चौधरी करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या