चाळीसगाव शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन ४४ सराईत ताब्यात, ३९ लाखांची वाहने डिटेन

चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगार, वॉरंटधारक आणि बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत ४४ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ३९ लाख रुपये किमतीची तीन वाहने डिटेन करण्यात आली.पोलीसांनी २४ जून रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील ८० आरोपींची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ४४ आरोपी आढळून आल्याने त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.कारवाईदरम्यान शस्त्रास्त्र कायद्यान्वये (आर्म्स ॲक्ट) एक गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अंतर्गत सुमारे ३९ लाख रुपये किमतीची वॅगनआर, ऑडी आणि वरना अशी तीन वाहने डिटेन करण्यात आली.याशिवाय आठ पकड वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करून ६० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच तीन जणांना समन्स

बजावण्यात आले.ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, गणेश सायकर यांच्यासह एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (LCB) तसेच तीन आरसीपी पथकांनी सहभाग घेतला. या कारवाई मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे . या प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .

