Saturday, July 18, 2026
Homeगुन्हाएसीबीची धडक कारवाई : जिल्हा परिषदेचे दोन अभियंते ७ हजारांची लाच स्वीकारताना...

एसीबीची धडक कारवाई : जिल्हा परिषदेचे दोन अभियंते ७ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद !

एसीबीची धडक कारवाई : जिल्हा परिषदेचे दोन अभियंते ७ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद !

रस्ते काँक्रिटीकरण व विकासकामांच्या बिलासाठी तडजोडीअंती लाचेची मागणी; धुळे एसीबीचा यशस्वी सापळा !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – रस्ते काँक्रिटीकरण व विविध विकासकामांचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती ₹७ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वर्ग-१ अभियंता आणि वर्ग-३ अभियंता यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.

मंगळवारी (दि. ७) दुपारी सुमारे ४ वाजता एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे चाळीसगावातील शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास एसीबीकडून केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या