Saturday, July 11, 2026
Homeगुन्हाअवैध गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल...

अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना ८ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडी येथील जुना डिझेल गॅरेज परिसर तसेच बसस्थानकामागील लक्ष्मीनगर भागात विशेष पथकाने सापळा रचून कारवाई केली.या कारवाईत अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३३३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका (क्र. एमएच-१८ डब्ल्यू-७८३७) असा एकूण ६,५७,०७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून चाळीसगावात तस्करी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी-विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कर्मचारी मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे आणि कल्पेश पगारे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या