Saturday, July 11, 2026
Homeचाळीसगावपत्रकाराचे वाहन बेकायदा ताब्यात ठेवणे तत्कालीन पोलीस निरीक्षक के के पाटलांना पडले...

पत्रकाराचे वाहन बेकायदा ताब्यात ठेवणे तत्कालीन पोलीस निरीक्षक के के पाटलांना पडले महागात – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची कारवाई

पत्रकाराचे वाहन बेकायदा ताब्यात ठेवणे तत्कालीन पोलीस निरीक्षक के. के. पाटलांना पडले महागात – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची कारवाई

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पत्रकाराचे वाहन बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात वर्षभराहून अधिक कार्यकाळ ठेवत पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक के के पाटलावर पोलीस विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्तांत असे माहिती अशी की, १४ फेब्रुवारी २०२२ मध्ये पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर रात्री ९ वा. सुमारास पत्रकार मंगेश शर्मा यांचे भाऊ लंकेश शर्मा व त्यांचे काही मित्र एका चहा विक्रेत्याचा वाढदिवस साजरा करीत होते. त्या ठिकाणी सुमारे १० ते १५ वाहने उभी होती तेवढ्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक के के पाटील व त्यांचे कर्मचारी त्याठिकाणी आले व तेथे उभी असलेली सर्व वाहने पोलिसांनी ठाण्यात जमा केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंगेश शर्मा पोलीस ठाण्यात गेले असता त्यांचे वाहन सोडून इतर सर्व वाहने पोलिसांनी सोडून दिले होते. के के पाटलांना वाहन सोडण्याबाबत विनंती केली असता तुम्ही पत्रकार असल्यामुळे काहीही कराल का? असे बोलत फार मोठा गुन्हा केल्यासारखे भासवू लागले तुमच्या वाहनाचे कागदपत्र आणा आणि वाहन घेऊन जा असे सांगितल्यानंतर काही वेळाने मंगेश शर्मा यांनी त्यांच्या वाहनाची कागदपत्र व लायसन्स दाखविले असता तुमचे नव्हे तुमच्या भावाचे लायसन्स दाखवा.
यावेळी मंगेश शर्मांनी त्यांना सांगितले साहेब कुणी चालवत नसलेल्या गाडीचे लायसन्स तुम्हाला कसे देणार यावरून साहेबांनी लायसन्स तुम्हाला द्यावेच लागेल असे सांगत वाहन देण्यास नाकारले मग अनेक लेखी तक्रारी दिल्या परंतु वाहन सोडण्यासाठी काही न काही कारण देऊन जवळजवळ दीड वर्ष पोलीस निरीक्षक के के पाटलांनी आपल्या अट्टाहासमुळे सदरील वाहन आपल्या पदाचा गैरवापर करत वाहन ताब्यात ठेवले. मंगेश शर्माने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी पोलीस निरीक्षक के के पाटलांना वाहन सोडण्यासाठी सांगितले तरीही पाटील यांनी वाहन सोडले नाही. अनेक वेळेस वाहनासाठी पोलीस ठाण्यात रेटे मारून पाटलांनी वाहन देण्यास नाकारले जणूकाही त्यांच्या मनात वाहनधारक पत्रकाराविषयी युद्धच पेटले होते.
यामुळे पत्रकार मंगेश शर्मा यांनी शेवटी के के पाटलांच्या “मी” पणाला कंटाळून विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण गाठले याबाबत सर्व तक्रारी व अर्ज प्राधिकरण विभागाला सोपवून के के पाटलांवर कारवाई करण्याची विनंती केली. या अनुषंगाने विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने के के पाटील यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला व गैरवर्तन केल्याचे मान्य केले आहे. दरम्यान याच संदर्भात मंगेश शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात रीत याचिका दाखल केलेली आहे त्यावर न्यायालयाच्या निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या