Monday, July 20, 2026
Homeगुन्हाजुन्या वादातून तरुणाच्या गळ्यावर लोखंडी कटरने तीन वार दोघांविरुद्ध गुन्हा

जुन्या वादातून तरुणाच्या गळ्यावर लोखंडी कटरने तीन वार दोघांविरुद्ध गुन्हा

चाळीसगावात जुन्या वादातून तरुणाच्या गळ्यावर लोखंडी कटरने तीन वार दोघांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               शहरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 26 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेताजी चौक परिसरात बोलावून घेतल्यानंतर संशयितांनी तरुणाला पकडून त्याच्या गळ्यावर लोखंडी कटरने तीन वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक शाम गोल्हार (वय 26, रा. पवारवाडी, कलाल गल्ली, स्टेशन रोड, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार महिन्यांपूर्वी माचीस मागण्याच्या कारणावरून शुभम पाटील याच्याशी वाद झाला होता. मात्र तो वाद आपसात मिटविण्यात आला होता.दरम्यान, 18 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 12.37 वाजता अमिर उर्फ बबडी निसार शेख याने मोबाईलवरून फोन करून नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 11 जवळील सुरेश स्वार यांच्या घरासमोरील रस्त्यावर बोलावले. तेथे शुभम मधुकर पाटील व अमिर उर्फ बबडी शेख हे दोघे उपस्थित होते.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून शुभम पाटील याने सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी अमिर उर्फ बबडी शेख याने फिर्यादीचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर शुभम पाटील याने लोखंडी कटरने गळ्यावर सलग तीन वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत फिर्यादीने आरडाओरड केल्याने दोन्ही संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनेनंतर जखमी प्रतिक गोल्हार यांनी मित्र कल्पेश पाटील यांच्या मदतीने चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी मेमो दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी अधिकृत फिर्याद दाखल केली.या प्रकरणी शुभम मधुकर पाटील व अमिर उर्फ बबडी निसार शेख, दोघेही रा. चाळीसगाव, यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या