Sunday, August 23, 2026
Homeजळगावमुसळधार पावसाचा तडाखा गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली, मोठा अनर्थ टळला

मुसळधार पावसाचा तडाखा गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली, मोठा अनर्थ टळला

मुसळधार पावसाचा तडाखा गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली, मोठा अनर्थ टळला
नगरसेविका सौ. सायलीताई रोशन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी नगरपरिषद कर्मचारी घटनास्थळी

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गांधी चौक परिसरातील नगरपालिकेची जुनी व जीर्ण इमारत शुक्रवारी अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच नगरसेविका सौ. सायलीताई रोशन जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेचे मुकादम राकेश जाधव व नगरपरिषदेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सुरक्षित करून पडझडीचा मलबा हटविण्याची कार्यवाही सुरू केली.
इमारत कोसळल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वेळेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. ही इमारत यापूर्वीच जीर्ण अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यामुळे शहरातील इतर धोकादायक व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या