विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
फैजपुर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी येथील विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश,दप्तर,वह्या तसेच दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्यांच्या सारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या संचालक मंडळातील मान्यवरांच्या हस्ते विपुल विलास बोरोले यांच्या प्रतिमेचे पूजन करून
पुष्पहार अर्पण करण्यात आला. बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ फैजपूरचे सहसचिव प्रा. डॉ. विलास चुडामण बोरोले यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतीनिमित्त शाळेतील इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वह्या तसेच इयत्ता दुसरी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या असे शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिरा, पोहे अल्पोपहार देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या कु. माही अमोल जैन व कु. भक्ती ललित बोंडे या दोन विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री. पंडित हिरामण कोल्हे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री पांडुरंग दगडू सराफ साहेब, श्री मोहन सुधाकर महाजन साहेब, सचिव श्री. डॉ. उमेश भालचंद्र चौधरी साहेब, चेअरमन श्री. पि.के चौधरी साहेब हे मान्यवर उपस्थित होते. तसेच सौ. भाग्यश्री सरोदे, कु. एशिका सरोदे उपस्थित होत्या. तसेच कुसुमताई
मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आय.एम तडवी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एल.जे.बोंडे सर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री एस.जी. ताजने सर यांनी केले. विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिर फैजपूरच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता पाटील मॅडम कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

