Friday, October 16, 2026
Homeचाळीसगावमराठा आरक्षणासाठी चाळीसगाव शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचे शोले...

मराठा आरक्षणासाठी चाळीसगाव शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचे शोले स्टाईल आंदोलन छेडले…!

मराठा आरक्षणासाठी चाळीसगाव शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचे शोले स्टाईल आंदोलन छेडले…!

चाळीसगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           – अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांचे सलग 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र शासन त्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आ
त्याच धर्तीवर चाळीसगाव शहरातील कोर्टाच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी मराठा समाजाच्या हितासाठी केलेल्या मागण्यांना जाहीर पाठिंबा म्हणून दि 13 सप्टेंबर2026 रोजी सकाळी 10 वाजता चाळीसगाव सकल मराठा समाजाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडण्यात आले,
अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षण द्यावे यासाठी अनेक मोर्चे आंदोलने झाले अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले मात्र महाराष्ट्र शासन फक्त आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करून तोंडाला पाणी पुसण्याचे काम करीत आहे. म्हणून मराठा योद्धा मनोज दादा जरांगे- पाटील यांनी पुन्हा मुंबई चलो चा नारा देऊन मराठा समाजाला मुंबईकडे कुच करण्याचे आदेश केल्यामुळे जळगाव, धुळे,नंदुरबार नाशिक या उत्तर महाराष्ट्रातुन लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने लवकरच वाटचाल करणार आहे, आंदोलनात गणेश पवार,प्रशांत गायकवाड,तमाल देशमुख,दिलीप पाटील पप्पू पाटील,अरूण पाटील दगाजी गुंजाळ,रमेश गोल्हार,माणिक गुंजाळ, अरूण गायकवाड, राजेंद्र पाटील, प्रदिप मराठे,गोकुळ पाटील,नाना शिंदे, बंडू पाटील,जनार्दन महाडिक, संदीप पाटील,नंदकिशोर जाधव केशव पाटील, अनिल शिंदे,दिपक पाटील,रविंद्र मोरे, मुकुंद पवार,प्रमोद वाघ,सचिन गायकवाड, स्वप्निल राखुंडे,बबलू गायकवाड, विक्की शिंदे,जितु गायकवाड,अनिल शिंदे, देवेंद्र पाटील, मानस पाटील, प्रा.शामकांत निकम, सतिष पवार, व्किरण पवार,शरद पवार,सुनिल पवार, सचिन स्वार,कृष्णा पवार, मनोहर पवार,भुषण पाटील,सुनिल पाटील, प्रतिभा पवार,अनिता शिंदे यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला भगिनी व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या