Friday, October 16, 2026
Homeचाळीसगावभाव मिळत नसल्याने भरघोस वांगे पीक ट्रॅक्टरने काढून टाकले

भाव मिळत नसल्याने भरघोस वांगे पीक ट्रॅक्टरने काढून टाकले

भाव मिळत नसल्याने भरघोस वांगे पीक ट्रॅक्टरने काढून टाकले

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     तरवाडे पेठ (ता. चाळीसगाव) येथील प्रगतिशील शेतकरी, शिवभक्त व माजी सैनिक नानासाहेब भाईदास पाटील यांनी आपल्या शेतात १ एप्रिल रोजी पंचगंगा गौरव सुपर या वांगे वाणाची लागवड केली होती. सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर पिकाची भरघोस वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन आले होते. मात्र, शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांनी

 

रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभे वांगे पीक काढून टाकले.शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचे हे विदारक चित्र आहे. यावेळी माजी सैनिक आबासाहेब गरुड, माजी सैनिक शरद पाटील, माजी सैनिक किरण चौधरी, विश्वास पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या