Monday, September 28, 2026
Homeचाळीसगावगणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील करगाव गावाजवळील गांव पांढरी शिवारातील तलावात गणपती विसर्जन करताना पाण्यात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता घडली. अनिल बुधा कुऱ्हाडे (वय ३०, रा. करगाव तांडा क्रमांक २) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुऱ्हाडे हे गणपती विसर्जनासाठी गांव पांढरी शिवारातील तलावावर गेले होते. विसर्जनाच्या वेळी ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सपोनि विजय माळी, एएसआय युवराज माळी, हवालदार प्रवीण सपकाळे, संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल बाविस्कर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत अनिल कुऱ्हाडे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या