Saturday, October 3, 2026
Homeजळगावमहात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रभातफेरी मोठ्या उत्साहात संपन्न

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रभातफेरी मोठ्या उत्साहात संपन्न

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रभातफेरी मोठ्या उत्साहात संपन्न

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि. २
ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यावल शहरात सत्य,अहिंसा,एकता,बंधुता आणि सद्भावनेचा संदेश देत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता बोरावल गेट,यावल शहर येथून प्रभातफेरीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत बुरुज चौक, यावल शहर येथे प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला.

यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत भगवान पाटील लिलाधर शेठ चौधरी शहरअध्यक्ष मो. हकीम मो याकुब,विलास शेठ तायडे ,महिला तालुका अध्यक्ष कल्पना अजय तायडे,अमोल भिरुड,सतीश आबा पाटील
उमर शेठ कच्ची,करीम मेंबर मन्यार,समीर मेंबर,शरीफ शेठ,
अशपाक शाह,अकिल सर,
गुलाम गौस,नईम भाई,शरद राजपुत,टेनु सोनार,राजू भाऊ बारी,वसीम भाई खान साकळी, सुनील पाटील निमगाव अभय महाजन,उमेश जावळे,गुडू पिंजारी,रिंकू बरडे,दिपक कोळी, पिरन तडवी,संतोष सुरवाडे, विकास पटाईत,सय्यद असद सय्यद जावेद,फिरोज भाई, कार्यकर्ते तसेच युवक व विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागी नागरिकांनी गांधी टोपी व पांढरे कपडे परिधान करून महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा,देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.

यावेळी सत्य, अहिंसा, एकता आणि सद्भावना या मूल्यांचा अंगीकार करून समाजात शांतता व बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि प्रशासनाचे सहकार्य लाभले. मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या