Thursday, March 12, 2026
Homeजळगावविद्यार्थ्याला मारहाण करीत रोकड हिसकावली !

विद्यार्थ्याला मारहाण करीत रोकड हिसकावली !

विद्यार्थ्याला मारहाण करीत रोकड हिसकावली !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पनवेल येथून जळगावात परतल्यानंतर रिक्षातून घरी जात असताना जगदीश लक्ष्मण बडगुजर (२६, रा. पिंप्राळा) या विद्यार्थ्याला मारहाण करीत धारदार वस्तूने वार केला. त्याच्याकडून रोख २० हजार २५० रुपयांसह मोबाइल, एटीएम कार्ड देखील हिसकावून घेतले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. जगदीश बडगुजर हा जळगावात आल्यानंतर घरी जाण्यासाठी तो रेल्वे स्थानक मार्गावरील एका हॉटेलसमोरून रिक्षात (क्र. एमएच १९, व्ही. ५६५८) बसला. रिक्षाचालक गोलू निकम (२२, रा. राम नगर) व प्रवीण महाजन या दोघांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच्या बॅगेतील एटीएम कार्ड, रोख २० हजार ५०० रुपये तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ३५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. याप्रकरणी जगदीश बडगुजर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या