Sunday, August 23, 2026
Homeचाळीसगावभरधाव ‘थार’ची दुचाकीला जोरदार धडक ; एक जागीच ठार, एक गंभीर !

भरधाव ‘थार’ची दुचाकीला जोरदार धडक ; एक जागीच ठार, एक गंभीर !

भरधाव ‘थार’ची दुचाकीला जोरदार धडक ; एक जागीच ठार, एक गंभीर !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महिंद्रा थार या वाहनाने मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला तर, मागे बसलेला व्यक्ती जखमी झाल्याची घटना दि.१९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धुळे चाळीसगाव रोड वरील दहिवद फाट्याजवळ वळणावर घडली असून मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, संभाजी शिवाजी पाटील (वय, ४७) धंदा, वाहन चालक रा, सोयगांव मालेगांव जि. नाशिक व राजेंद्र शालीदर जाधव (वय, ३९) रा. राम मंदिर ग्राम पंचायत मालेगांव ता. मालेगांव जि. नाशिक हे दिनांक १९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मो.सा.क्र. एमएच ४१ बी. क्यू २८१७ वरून जात असताना धुळेकडून चाळीसगाव कडे येणारी महिंद्रा थार या गाडीने त्यांच्या मोटारसायकलला धुळे चाळीसगाव रोड वरील दहिवद फाट्याजवळ वळणावर धडक दिल्याने त्यात राजेंद्र शालीदर जाधव (वय, ३९) रा. मालेगांव जि. नाशिक यांचा मृत्यू झाला तर संभाजी शिवाजी पाटील हे जखमी झाले होते. अपघात होताच महिंद्रा थार गाडी क्र. एमएच १९ डी. व्ही. ०५०५ हिच्या वरील चालक जागेवर न थांबता पळुन गेला होता. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला महिंद्रा थार वरील चालक नांव गांव माहीत नाही याचे विरोधात भा. न्या. सहिंता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (इ), ३२४(४), ३२४ (५) मो. वाहन कायदा क. १८४, १३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. रविंद्र बत्तीशे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या