Sunday, August 23, 2026
Homeगुन्हा२३ वर्षीय तरुणीचा केला पाठलाग ; गुन्हा दाखल !

२३ वर्षीय तरुणीचा केला पाठलाग ; गुन्हा दाखल !

२३ वर्षीय तरुणीचा केला पाठलाग ; गुन्हा दाखल !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात परराज्यात उच्च शिक्षण घेत असलेल्या व सध्या सुटीवर घरी आलेल्या २३ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने पाठलाग करून तरूणीशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून तरुणाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडित तरूणी परराज्यात उच्च शिक्षण घेते. महाविद्यालयाला सुद्या असल्याने ही तरुणी घरी आली होती. ही तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत दि.११ रोजी सायंकाळच्या सुमारास स्कुटीवरून जात असतांना संशयित शुभम मिटकर हा तरुणीच्या पाठीमागून येतांना दिसला. तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. काही अंतर गेल्यावर त्याने पुन्हा दुचाकीवरून पाठलाग केला. हा प्रकार तरुणीने आई-वडिल व भावास सांगितला असता भावाने पाठलाग का करतो म्हणून विचारणा केली असता पीडित तरूणी व संशयित आरोपीच्या मित्रांमध्ये वाद झाला. पीडिताने या प्रकरणी शहर पोलीसात धाव घेऊन फिर्याद दिली. या प्रकरणी तरूणाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या