Thursday, May 15, 2025
Homeजळगावअतिक्रमण काढण्यासाठी पोलीस,महसूल,राजकीय सामाजिक यंत्रणेचे सहकार्य अपेक्षित.

अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस,महसूल,राजकीय सामाजिक यंत्रणेचे सहकार्य अपेक्षित.

यावल शहरासह नगरपरिषद अतिक्रमणाच्या विळख्यात.

अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस,महसूल,राजकीय सामाजिक यंत्रणेचे सहकार्य अपेक्षित.

अतिक्रमण धारकांकडून खर्च वसूल होणार..

यावल दि.१४   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषद हद्दीत अतिक्रमणामुळे यावलकरांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे यावल नगरपरिषदेने आता अतिक्रमण काढणे संदर्भात प्रत्यक्षात कायदेशीर कार्यवाही सुरू केल्याने अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत पोलीस,महसूल,राजकीय व सामाजिक यंत्रणेने नगरपरिषदेला सहकार्य केल्यास यावल एक सुंदर शहर म्हटले जाईल.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यावल शहरात अनेकांनी आपली घरे,दुकाने बांधकाम करताना सोयीनुसार अतिक्रमण केले आहे.अनेकांनी तर भर रस्त्यात आपल्या दुकानातील वस्तूंचे,सामानाचे बेकायदा दुकानेच भर रस्त्यावर मांडले आहे. यामुळे दैनंदिन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अतिक्रमण करणाऱ्यांना कोणा कोणाचे आशीर्वाद आणि सहकार्य होते आणि आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञान आहे.यामुळे यावल नगरपरिषद प्रशासनाला अतिक्रमण काढणे संदर्भात आणि प्रतिबंध करण्यास प्रत्यक्षात खूप अडचणी येत होत्या आणि आहेत.पर्यायी यावल शहरात दररोज वाहतुकीस सतत अडथळा निर्माण होत असल्याने अनेक वेळा भांडणे, तंटे, वाद किरकोळ अपघात सुरू आहेत त्यामुळे आणि एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू नये म्हणून
यावल शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्यांना यावल नगर परिषदेने एक अधिकृतरित्या जाहीर सूचना देऊन अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात कळविले आहे.
जाहीर सूचनेत नमूद करण्यात आले आहे की,यावल शहरातील व नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण झालेले दिसून येत आहे.यावल शहरात अतिक्रमण असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून अवजड तसेच प्रवासी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे अप्रिय घटना घडून
दुर्घटना होवू शकते.तरी शहर विद्रुपीकरण टाळणे व रस्ते मोकळे करणे करिता अतिक्रमण काढणे मोहिम राबविण्यात येणार आहे.
तरी त्वरित ३ दिवसांत स्वखर्चाने अतिक्रमण धारकाने अतिक्रमण काढणे अन्यथा होणाऱ्या नुकसानास वैयक्तीक अतिक्रमण धारक जबाबदार राहील त्याच प्रमाणे नगरपरिषदेने अतिक्रमण काढल्यास अतिक्रमण
काढण्याचा खर्च संबंधितकडून वसूल करण्यात येईल तरी संबंधितांनी ३ दिवसांत अतिक्रमण काढावे,याबाबत पूर्वसूचना दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. अशी जाहीर सूचना यावर नगरपरिषदेने दिली आहे.
अशाप्रकारे सूचना दिल्याने यावल नगरपरिषदेने पुढील कार्यवाही तात्काळ करावी आणि त्यासाठी पोलीस, महसूल, राजकीय व सामाजिक यंत्रणेने नगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य करावे अशी रास्ता अपेक्षा यावलकरांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या