Monday, July 6, 2026
Homeगुन्हामोठी कारवाई : कुरेशी मोहल्ला परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या दांपत्याला अटक !

मोठी कारवाई : कुरेशी मोहल्ला परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या दांपत्याला अटक !

मोठी कारवाई : कुरेशी मोहल्ला परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या दांपत्याला अटक !

Oplus_131072

<img class

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. ही पंधरा दिवसांतील तिसरी मोठी कारवाई असून, त्यामुळे अवैध गोमांस विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, गुप्त माहितीच्या आधारे रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने दिनांक १४ मे रोजी सकाळी धाड टाकली. धाड टाकताना नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (वय ५५) हे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापताना आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दांपत्याला अटक केली. मात्र, त्यांना मदत करणारा तिसरा इसम गल्लीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला.
या कारवाईत ४० हजार किमतीचे गोमास, कुन्हाड, सुरे जप्त केले आहे. कारवाई प्रसंगी पो. ना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे उपस्थित होते. पुढील तपास पो.ना कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या