तहसीलदार निता लबडे यांची अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कडक कारवाई!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ परिसरात अवैध गौण खनिज वाहतूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने तहसीलदार निता लबडे यांनी सुद्धा विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहने जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची पहिली कार्यवाही दि.१४ मे २०२५ व रोजी सकाळी ५:३० ते ६:०० च्या दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाही करता पथक सुनसगाव कुऱ्हे प्रन रोडवर गस्त घालताना सुंदर किशोर मानकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र. MH-३४ -BG-४५१५ हे ट्रॅक्टर सुनसगांव गावाच्या दिक्षेकडुन गोजोरे या गावाकडेस येत असता वाहन तपासणी केली असता वाळू या गौण खनिजाची वाहतुक केले जात असले बाबत अढळुन आले वाहन चालक यांचे कडेस वाळु वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अगर पावती नसल्याने सदरची वाहतुक अवैधरित्या करीत असल्याने सदर वाहन जप्त केले असुन वाहनाचा पंचनामा करणेत आलेला असुन वाहनात 1 ब्रास वाळु अढळुन आला असुन दंडात्मक कार्यवाही होणे कामी तहसील कार्यालयात जमा केले आहे.
दुसरी कार्यवाही : जळगाव गावच्या दिशेकडून पिवळ्या रंगाचे डंपर MH १९-Z-४९२३ विशाल नामदेव सपकाळे राहणार जळगाव यांच्या मालकीचे तपासणी करता थांबवले असता सदर वाहनांमध्ये वाळू या गौणखनिज ची वाहतूक होत होती वैध परवाना अगर पावती नव्हती त्यामुळे सदर वाहन जप्त करण्यात आले असून वाहन व वाहनातील 1.5 ब्रास वाळु असले बाबत गौणखनिजाचा पंचनामा केलेला असुन वाहनावर दंडात्मक कार्यवाही कामी वाहन तहसील कार्यालयात जमा केले आहे. पथक मधील कर्मचाऱ्यांचे नाव प्रवीण पाटील मंडळ अधिकारी कुऱ्हे प्र.न, साधना खुळे तलाठी गोजोरे, सुनिता वळवी तलाठी सूनसगाव, नितीन केले तलाठी वराडसिम, मिलिंद तायडे तलाठी साकेगाव, जितेश चौधरी कोतवाल साकेगाव व संदीप पाटील वाहन चालक तहसील कार्यालय भुसावळ हे होते .
तिसरी कार्यवाही : दिनांक १५ मे २०२५ वांजोळा रोड फाटा आदित्य लॉन्स जवळ पिवळे रंगाचे डंपर तपासणी कामी थांबविले असता सदर वाहनात वाळु हया गौणखनिजाची वाहतुक केली जात असल्याचे आढळुन आले होते . तसेच वाहन चालकाकडेस तपासणी वेळी कोणताही वैध परवाना अगर पावती नव्हती वाहनाचा क्रमांक GJ-04-AU- ७४०४ असा असुन वाहन मालक मंगल देविदास कोळी यांचे मालकीचे असुन वाहन मालक यांचे सांगणेवरुन सुजदे भोलाणे शिवार तापी नदी पात्रातुन चोरटया मार्गाने मजुराचे सहाय्याने वाळुचा भरणा करुन भुसावळ येथे खालील करीत असल्याचे वाहन चालक यांचे जाबाब मध्ये नमुद केले आहे सदर वाहन व वाहनाचा पंचनामा केलेला असुन वाहनात 2 ब्रास वाळु एवढे असुन वाहनावर दंडात्मक कार्यवाही होणे कामी सदरचे वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय, भुसावळ येथे जमा केलेले आहे.
चतुर्थ कार्यवाहीत : भुसावळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 खडका रोड चौफुली वाहन क्र. एमपी-48-एच-0471 हे डंपर वाहन साकेगांव गावाच्या दिशेकडुन भुसावळ कडेस वाहतुक करीत असतांना पुढे मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे सयुक्तीक पथकांने सदरचे वाहन तपासणी कामी थांबविले वाहानात वाळु हया गौणखनिजाची वाहतुक होत होती वाहन चालकाकडेस मागणी केली असता तपासणी वेळी परवाना अथवा ईटीपी नव्हती त्यामुळे सदरचे वाहन ताब्यात घेऊन वाहनाचा पंचनामा केलेला आहे वाहन मालक संदिप बेनीलाल परदेशी रा. साकेगांव ता. भुसावळ व आर सी बुक नुसार अमोल मालवीय असे आहे अवैध गौणखनिज वाहतुक केले सदरचे वाहन दंडात्मक कारवाई करणे कामी तहसिल कार्यालय, भुसावळ येथे जमा केलेले आहे .
सदर पथकात रजनी तायडे मंडळ अधिकारी वरणगांव, प्रविण पाटील मंडळ अधिकारी कुऱ्हे प्र.न., मंगेश पारीसे, तलाठी तळवेल, सुनिता वळवी तलाठी सूनसगाव यांचा समावेश होता ह. या कारवाई मुळे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर चांगलांच वचक निर्माण झाला आहे .