Monday, July 6, 2026
Homeचाळीसगावपोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण पोलिस ठाण्यात ठाण मांडून.

पोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण पोलिस ठाण्यात ठाण मांडून.

पोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण पोलिस ठाण्यात ठाण मांडून.

Oplus_131072

<img class

चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          एका पोलिसांने एका प्रकरणात गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी एका व्यक्तीकडून एक लाख रुपये घेतल्याच्या कारणावरून पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आमदार मंगेशराव चव्हाण पोलीस स्टेशनला ठाण मांडून आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आज सोमवार दि.१९ मे २०२५ जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एक संताप जनक लाचखोरीची घटना आमदार मंगेशराव चव्हाण यांच्या पर्यंत पोहोचली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
चाळीसगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तडजोडीनंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने एक लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
खंडणी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
संबंधित तरुणाने यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे गाठले. यावेळी आमदारांनी तक्रारदार तरुणाशी पोलिस अधिकाऱ्यां समोरच संवाद साधला.त्यावेळी संबंधित तरुणाने पैशांची मागणी झाल्याची कबुली दिली.यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता,त्या पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी,अशी आग्रही मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा,या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत पोलिस ठाणे सोडणार नाही,असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे.यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा,पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही ? असा प्रश्नही आमदार चव्हाण यांनी विचारला.
काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आवाज उठवला होता. विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समितीचे कर्मचारी २० ते ३० हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार आमदार चव्हाण यांच्याकडे आली होती. यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पंचायत समिती गाठत, दोन दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे कारवाई झाली होती .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या