Wednesday, May 21, 2025
Homeगुन्हायावल पोलिसांनी अवैध गुरांची वाहतूक रोखून केली कारवाई.

यावल पोलिसांनी अवैध गुरांची वाहतूक रोखून केली कारवाई.

यावल पोलिसांनी अवैध गुरांची वाहतूक रोखून केली कारवाई.

यावल दि.२१      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.  यावल फैजपूर रोडवर यावल पोलीस स्टेशन पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर सांगवी बस स्टॉप जवळ अवैधरीत्या गुरांची कत्तल करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गुरांची वाहतूक करीत असल्याची गुप्त खबर यावल पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी १ छोटा हत्ती वाहन रोखून कारवाई करून त्यातील जरसी जातीचे २ गोधन मनवेल येथील गो शाळेत रवाना केले या कारवाईमुळे अवैधरित्या गुरांची वाहतूक करून कट्टर करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
आज बुधवार दि.२१ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० वा तसेच पोउनि मसलोद्दीन शेख,पो.कॉ.
२००२ मुस्तफा तडवी.असे सरकारी वाहनासह गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी फोनद्वारे कळविले की मला
आताच गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाले की,फैजपुर कडून यावल कडे रस्ताने काही ईसम हे अवैधरीत्या गुंराची कत्तल
करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गुंराची वाहतुक करीत आहे,तुम्ही बातमीची खात्री करुन करवाई करा,असे आदेशीत केल्याने
आम्ही यावल कडून फैजपुर रस्ताने जात असताना सांगवी बस स्टॉफ जवळ एक माल वाहतुक चारचाकी वाहन ( छोटा हत्ती पिकअप वाहन ) क्र. MH.०४. EY.२११८ जवळ बरीच गर्दी दिसली आम्ही चालकास विचारपुस करुन वाहनात डोकावुन पाहिले असता वाहनात गोवंश जातीची २ जनावरे त्यांना पुरेसा चारा पाण्याची व्यवस्था न करता,त्यांना पुरेशा श्वासोच्छावासाची मोकळी जागा न ठेवता,अत्यंत दयनीय अवस्थेत वाहनात कोंबुन कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आम्ही वाहन चालक यास त्याचे नाव,गाव,
विचारले असता वाहन चालक याने त्याचे नाव मो.अदनान सगीर कुरेशी
वय १९ रा इस्लामपुरा सावदा ता. रावेर जि जळगाव. तसेच तसेच गुरे घेणारा मालक हा सुध्दा सदर ठिकाणी हजर असुन त्यास त्याचे नाव गाव विचारेल असता हमीद झुम्मा तडवी रा.परसाडे ता.यावल जि.जळगाव असे सागितले
असता सदरचे गुरे ही कोठून कोणाकडून विकत घेतली आहे याबाबत विचारले काही एक माहीती दिली नाही.त्यावेळी
गर्दीतील लोक ०१, ) भरत रविद्र कोळी, रा सांगवी ता यावल, 02) सचिन अंबदास पाटील,रा हिगोणा ता यावल निलेश गोकूळ कोळी रा. सांगवी,महेंद्र निवृत्ती कोळी, रा. सांगवी ता.यावल अशानी प्रत्यक्ष घटना पाहून आम्हाला
योग्य ती मदत केली आहे.सदर वाहनात गोवश जातीचे २ जनावरे
वर्णन खालील प्रमाणे.
पन्नास हजार रुपये किमतीची एक फिक्कट पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची छोटा हत्ती चार चाकी क्र.MH-०४- EY २११८ , बारा हजार रुपये किमतीची लाल रंगाची जर्सी जातीची व शिंगे मध्यम वय अंदाजे दहा वर्ष असलेली शेपटीचा गोंडा काळा असलेली जरसी गाय, पंधरा हजार रुपये किमतीची काळा रंगाचे जर्सी क्रॉस ब्रेड शिंगे लांब वय अंदाजे आठ वर्ष असलेली शेपटीचा गोंडा पांढरा असलेली गाय अशा एकूण ७७ हजार रुपये किमतीचा पंचनामा करून पोलिसांनी माल ताब्यात घेतला व पुढील कारवाई करून चालक
अदनान सगीर कुरेशी वय १९, राहणारी इस्लामपुरा सावदा, गुरे घेणारे मालक आम्ही जुम्मा तडवी राहणार पडसाडे तालुका यावल यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या