‘खुन्नस देऊन बघितल्याच्या’ कारणावरून महिलेवर धारदार शस्त्राने वार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ‘खुन्नस देऊन बघितल्याच्या’ कारणावरून शिवाजीनगरात एका ५८ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना २५ मे रोजी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शनिवारी सायंकाळी ७:०० वाजता मंगला संजय राठोड यांचा मुलगा विजय घराबाहेर बसलेला असताना, प्रेम सांगोरे दुचाकीवरून जाताना त्याने खुन्नस देऊन बघितल्याचा आरोप विजयने केला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन प्रेम सांगोरेने आपल्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. प्रेम विलास सांगोरे, विलास रमेश सांगोरे, अमोल रमेश सांगोरे आणि ओम कैलास सांगोरे (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी विजयला शिवीगाळ करत मारहाण केली. मात्र, याच घटनेनंतर रविवारी मध्यरात्री २:०० वाजता ओम कैलास सांगोरे दारूच्या राठोड यांच्या घराजवळ आला. मंगला राठोड यांनी दार उघडताच हत्याराने त्यांच्या बोटावर वार केले.