Wednesday, May 28, 2025
Homeजळगावभाजपाचे माजी पदाधिकारी डॉ.निलेश गडे यांनी कडुलिंबाची जिवंत झाडे कापल्याची तक्रार.

भाजपाचे माजी पदाधिकारी डॉ.निलेश गडे यांनी कडुलिंबाची जिवंत झाडे कापल्याची तक्रार.

भाजपाचे माजी पदाधिकारी डॉ.निलेश गडे यांनी कडुलिंबाची जिवंत झाडे कापल्याची तक्रार.

माजी पदाधिकारी असल्याने कारवाई झाली नाही तक्रारदाराचा आरोप.

यावल दि.२७.   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                सामायिक बांधावर असलेली कडुलिंबाची जिवंत झाडे यावल येथील डॉ. निलेश गडे यांनी संबंधितांची परवानगी न घेता कापून टाकल्याची तक्रार यावल येथील प्रादेशिक वन विभाग पूर्व, यावल तहसीलदार यांच्याकडे करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर निलेश गळे भाजपाचे माजी पदाधिकारी असल्याने मागील अर्जावर सुद्धा कारवाई केली नाही.

यावल येथील कमलाकर पुंडलिक बारी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,मौजे यावल येथील शेत गट नं. ८१/१ हे
माझे व माझे भाऊ असे आमचे नावाने व मालकीची शेत मिळकत आहे.सदर शेताच्या पुर्व बांधावर व उत्तर बांधावर कडुलिंबाची जवळ जवळ २० त ३० वर्षाची मोठ मोठी
झाडे आहेत.सदर झाडे ही गट नं. ८३ व ८१/१ च्या सामाईक
बांधावर आहेत.परंतु सदर झाडे ही गट नं. ८३ चे मालक यावल येथील डॉ.निलेश सुरेशचंद्र गडे यांनी माझी किंवा माझ्या भावांची आमची
कोणाची अगर कोणतीही सरकारी परवानगी न घेता सदर झाडे आज दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान तोडली आहेत.यापुर्वी ही मी आपणाकडे निलेश सुरेशचंद्र गडे यांचे विरुध्द झाडे तोडल्याबाबत अर्ज
दिला होता. परंतु त्या तक्रार अर्जाची कोणतीही चौकशी झालेली नाही किंवा त्याबाबत मला कोणतीही लेखी माहिती पुरविली नाही.सदर डॉ.हे भारतीय
जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष आहेत.त्यामुळे त्यांचेवर कोणतीही कारवाई आपण केली नाही.असे दिसुन येत आहे.
डॉक्टर निलेश गळे यांनी सदर झाडे तोडण्याची परवानगी मागितली असेल तर आपण त्या अर्जाची व पंचनामेची प्रत मला द्यावी मी त्याची सरकारी फी सुद्धा बनण्यास तयार आहेत तसेच जर परवानगी मागितली नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार कमलाकर पुंडलिक बारी यांनी वन विभाग आणि यावल तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या