Wednesday, May 28, 2025
Homeजळगावशहरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी लष्कर जवानाच्या घरातून सोनं व महत्त्वाची कागदपत्रं...

शहरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी लष्कर जवानाच्या घरातून सोनं व महत्त्वाची कागदपत्रं लंपास

शहरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी
लष्कर जवानाच्या घरातून सोनं व महत्त्वाची कागदपत्रं लंपास

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शहरातील शांतीनगर परिसरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भारतीय लष्करातील जवान किरण रामचंद्र इंगळे यांच्या घरातून सुमारे चार तोळे सोनं व महत्त्वाची कागदपत्रं अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

किरण इंगळे हे सध्या आग्रा कॅन्ट येथील लष्करी छावणीत कार्यरत असून, चार मे रोजी दोन महिन्याच्या सुट्टीवर भुसावळ येथे आले आहेत. मंगळवारी सकाळी १०.३०वाजता इंगळे कुटुंब अंजाळे येथे वॉटर पार्कला गेले असता, चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराचे दोन्ही दरवाज्यांचे कुलूप तोडले आणि घरातील कपाट फोडले.

 

Oplus_131072

घरात अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमची सोन्याची रिंग, दोन पाच ग्रॅमच्या अंगठ्या, चार ग्रॅमची आणखी एक अंगठी, तसेच एटीएम, क्रेडिट कार्ड, लष्करी ओळखपत्र, आधार, पॅन कार्ड व सोनं खरेदीच्या पावत्या असा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी किरण इंगळे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाची मदत घेण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या