Thursday, June 12, 2025
Homeचाळीसगावहिंस प्राण्याने बकऱ्यांवर केला हल्ला : १८ जनावरांचा मृत्यू !

हिंस प्राण्याने बकऱ्यांवर केला हल्ला : १८ जनावरांचा मृत्यू !

हिंस प्राण्याने बकऱ्यांवर केला हल्ला : १८ जनावरांचा मृत्यू !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील तमगव्हाण येथून जवळच असलेल्या माळशेवगे येथील प्रकाश विक्रम पाटील यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर अज्ञात हिंस प्राण्याने हल्ला केला. यात १७बकऱ्या व १ मोठा बोकड अशा १८ जनावरांचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, प्रकाश पाटील यांनी त्यांच्या शेतात शेड उभारले होते. यात ४० शेळ्या ठेवल्या होत्या. ९ जूनला रात्री चारा टाकून ते घरी आले. मात्र, रात्री हिंस्र प्राण्यांनी या शेडमधील शेळ्यांवर हल्ला करून ४० पैकी १७ शेळ्या व एक बोकड अशा १८ जनावरांना ठार मारले. सकाळी प्रकाश पाटील हे शेडमध्ये गेले असता त्यांना एकूण १८ जनावरे मृतावस्थेत दिसली. त्यांनी वनविभाग तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. यावेळी वनविभागाचे अजय मयुरे तर शिरसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भट यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे २ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वीसुद्धा माळशेवगे येथील पोलिस पाटील राजेंद्र पाटील यांच्या शेडमध्ये शेळ्यांवर असाच हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातही ६ ते ७ शेळ्या हिंस्र प्राण्याने ठार केल्या

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या