Sunday, August 23, 2026
Homeगुन्हाचोरट्यांचा हैदोस ! गाडीच्या डिक्कीतून २ लाख लंपास

चोरट्यांचा हैदोस ! गाडीच्या डिक्कीतून २ लाख लंपास

चोरट्यांचा हैदोस ! गाडीच्या डिक्कीतून २ लाख लंपास

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – निवृत्त वृद्ध कर्मचाऱ्याने बँकेतून २ लाखांची रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. तर रस्त्याने जातांना जांभूळ खरेदी केले व ते डिक्कीत ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता त्यातील २ लाख रूपये चोरी झाल्याचा प्रकार शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ गुरुवारी दुपारी उघडकीस आला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील संत रोहिदास सोसाटीत शिरीषकुमार भास्कर लिंडायत (वय ७२) हे पेन्शनर राहतात. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी स्टेट बँकेतील कृषी शाखेतील सुनेच्या खात्यातून १२ रोजी दुपारी ११.४५ वाजेच्या सुमारास धनादेश वटवून सुमारे २ लाख रूपये काढलेत. लिंडायत यांनी हे पैसे आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले व घराकडे निघाले. दरम्यान, रस्त्याने जाताना भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ लोटगाडीवर जांभूळ खरेदीसाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. जांभुळ खरेदी करून ते ठेवण्यासाठी दुचाकीची डिक्की उघडली असता त्यांना डिक्कीतील २ लाख चोरी झाल्याचे दिसले. शिरीषकुमार लिंडायत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या