Thursday, June 19, 2025
Homeगुन्हापोलिसांची मोठी कारवाई : ६१ गॅस सिलिंडरसह साहित्य जप्त !

पोलिसांची मोठी कारवाई : ६१ गॅस सिलिंडरसह साहित्य जप्त !

पोलिसांची मोठी कारवाई : ६१ गॅस सिलिंडरसह साहित्य जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत ६१ गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (१७ जून) दुपारी असोदा रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी नारायण दाजीबा सोनवणे (वय ६०), राहुल नारायण सोनवणे (२९, रा. दोघे रा. दिनकरनगर), आदेश राजू पाटील (२३, रा. दिनकरनगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,असोदा रस्त्यावरील पिवळी भिंत परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील विक्की इंगळे, गजानन वाघ, नवजीत चौधरी, रवींद्र साबळे, अमोल वंजारी नीलेश घुगे, पराग दुसाने यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथक घटनास्थळी पोहोचले असता घरगुती गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना तीनजण आढळले. पथकाने ६१ गॅस सिलिंडर, पंप, वजनकाटा व मालवाहतूक रिक्षा असा एकूण दोन लाख २३ हजार २३८ रुपयांचा ऐवज जप्त केला-याप्रकरणी पोलिस कर्मचारी गजानन वाघ यांनी फिर्याद दाखल केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या