Wednesday, August 6, 2025
Homeआरोग्यमहिला डॉक्टरशी गैरवर्तन भोवल : वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप निलंबित !

महिला डॉक्टरशी गैरवर्तन भोवल : वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप निलंबित !

महिला डॉक्टरशी गैरवर्तन भोवल : वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप निलंबित !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या काही महिन्यापासून जळगाव मनपातील एका अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप होत असतांना आता अधिकाऱ्यावर मनपा आयुक्तांनी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला काम करण्याची मुभा देणे या दोन्ही प्रकरणात दोषी धरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जागी तिचा पती काम करत असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी महिन्यापासून सुरू होती. तीन सदस्य असलेल्या चौकशी समितीकडून चौकशी अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. तसेच सहकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी महिलेने तक्रार केली होती. या तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना सादर केला होता त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये डॉ. विजय घोलप यांना दोषी धरून निलंबित करण्यात आले आहे.कंत्राटी नोकरी प्रकरणानंतर डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर विशाखा समितीकडून डॉ. घोलप यांची चौकशी सुरू आहे. यात डॉ. विजय घोलप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. घोलप यांनी लेखी खुलासा टपालाद्वारे समितीकडे पाठविला होता. महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर त्या महिलेचा पती काम करीत होता. अनेक दिवस महिला कर्मचारी कामावर नसतांना तिचा पती त्याठिकाणी काम करीत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हा अहवाल तपासणीसाठी आस्थापना शाखेकडे पाठविला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या