Wednesday, August 6, 2025
Homeगुन्हालहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये मोठा राडा !

लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये मोठा राडा !

लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये मोठा राडा !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये वाद होऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री कालिंका माता मंदिराजवळ घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ताराबाई सुकलाल शिंदे (६०, रा. कालिंका माता चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून त्यांच्यासह मुलगा व सुनेला चार जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटातील देवीदास लाला सोळंखे (६६, रा. कालिंका माता चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काहीही कारण नसताना तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या