भुसावळ येथील मातृभूमी गणेश मंडळाचा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध गणेशोत्सव
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील मातृभूमी चौकातील मातृभूमी गणेश मंडळाने यंदा भव्य गणेश मूर्तीची प्रस्थापना करून गणेशोत्सवात उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मंडळाने या ठिकाणी विविध देवी–देवता व ऋषींच्या मूर्ती साकारून आकर्षक सजावट केली असून छोटेखानी आनंद मेळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ परिसरातील सर्वात मोठे मंडळ म्हणून ओळखले जाणारे मातृभूमी गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहे. या उत्कृष्ट आयोजनाचे प्रशासनाकडूनही कौतुक करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. गुरुवारी भाग्यवेद अकॅडमीचे निळे सर, नगरसेवक युवराज लोणारी, सौ. मीना लोणारी, प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शेलोडे, शहर पत्रकार संघाचे प्रेम परदेशी, दै. देशदूत चे प्रतिनिधी मनोहर लोणे व नवराष्ट्र चे प्रतिनिधी सुनील आराख यांचा साकार करण्यात आला.
मातृभूमी गणेश मंडळाचा हा शिस्तबद्ध आणि भक्तिमय गणेशोत्सव भाविकांसाठी .आकर्षणाचा विषय ठरत असून, शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या संख्येने भाविक मंडळाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत .