Sunday, February 8, 2026
Homeगुन्हाशहरात हायप्रोफाईल चोरी: निवृत्त प्राध्यापकाच्या दारातून 'टाटा नेक्सॉन' लंपास!

शहरात हायप्रोफाईल चोरी: निवृत्त प्राध्यापकाच्या दारातून ‘टाटा नेक्सॉन’ लंपास!

शहरात हायप्रोफाईल चोरी: निवृत्त प्राध्यापकाच्या दारातून ‘टाटा नेक्सॉन’ लंपास!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील गजबजलेल्या आयएमआर कॉलेज जवळील रामबाग कॉलनी परिसरातून ८ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. प्लॉट नं ५, रामबाग कॉलनी, जळगाव) हे सेवानिवृत्त असून आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली टाटा नेक्सॉन कार (क्रमांक MH-19 DV-7790) घरासमोरील सार्वजनिक रोडवर नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जेव्हा ते घराबाहेर आले, तेव्हा त्यांना आपली कार त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही कार मिळून आली नसल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

चोरीला गेलेल्या कारची किंमत ८ लाख रुपये असून, त्यामध्ये महत्त्वाचे इंजिन आणि चेसिस क्रमांक देखील नमूद करण्यात आले आहेत. या घटनेमुळे उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनी आणि रामबाग कॉलनी परिसरात खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ मिलिंद सोनवणे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या