Sunday, February 8, 2026
Homeगुन्हाजुगार अड्ड्यावर छापा! १३ जणांवर गुन्हा दाखल; ७,११० रुपये जप्त

जुगार अड्ड्यावर छापा! १३ जणांवर गुन्हा दाखल; ७,११० रुपये जप्त

जुगार अड्ड्यावर छापा! १३ जणांवर गुन्हा दाखल; ७,११० रुपये जप्त

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने शिंदी गावातील बाजार पट्टीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ७ हजार ११० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत शिंदी गावातील बाजार पट्टीजवळील मोकळ्या जागेत काही इसम पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पंचनामा करून शासकीय वाहनाने पोलीस पथकाने छापा टाकला.छाप्यात रामेश्वर रामदास राठोड (३०), संदिप शिवनाथ दौड (वय ४४), हेमंत आण्णासाहेब राऊत (५२), गोरख मुरलीधर दौड (४२), बाळू शिवराम नेवरे (५०), शेख सेरिफ शेख बनीर (७०), मनोहर जगन्नाथ फाटे (४६), गजेंद्र वाल्मीक राठोड (३५), श्रावण महादू ठाकरे (४१), कैलास रामभाऊ गरुड (६०), रणजीत चांगदेव पवार (४८) सर्व रा. शिंदी ता. चाळीसगाव, तसेच रमेश लक्ष्मण राठोड (३३) रा. शिंदी तांडा व अनिल मगन राठोड (३५) रा. राजदेहरे, ता. चाळीसगाव अशा १३ जणांना ताब्यात घेण्यात आले.

पंचासमक्ष अंगझडती घेतली असता संबंधितांकडून वेगवेगळ्या प्रमाणात रोख रक्कम व ५२ पत्त्यांचे दोन कॅट जुगाराचे साहित्य मिळून आले. एकूण ७,११० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अक्रम मुबारक बेग करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या