Friday, February 13, 2026
Homeजळगावप्रयागराज ते मुंबई ४४ साप्ताहिक रेल्वेगाड्या भुसावळमार्गे धावणार 

प्रयागराज ते मुंबई ४४ साप्ताहिक रेल्वेगाड्या भुसावळमार्गे धावणार 

प्रयागराज ते मुंबई ४४ साप्ताहिक रेल्वेगाड्या भुसावळमार्गे धावणार
.१७ फेब्रुवारी ते १४ जुलै दरम्यान दर मंगळवारी मुंबईहून निघणार ( सब हेडिंग )

जळगाव  खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि प्रयागराज दरम्यान 44 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे प्रवाशांची सोय होणार असून या विशेष सेवेमुळे होळी व उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे.

०४१०२ साप्ताहिक विशेष गाडी १७ फेब्रुवारी ते १४ जुलै २०२६ दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी ४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी रात्री ००.५० मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल. नंतर त्याच दिवशी सायंकाळी ०५.०० वाजता प्रयागराज येथे पोहचेल. या गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी १७ ते २४ फेब्रुवारी आणि ७ ते १४ एप्रिल कालावधीत ४ फेऱ्या, ३ ते ३१ मार्च दरम्यान होळी विशेष ५ फेऱ्या तसेच २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान उन्हाळी विशेष १३ फेऱ्या होतील.

०४१०१ साप्ताहिक विशेष गाडी १६ फेब्रुवारी ते १३ जुलै दरम्यान प्रत्येक सोमवारी सायंकाळी ०६.०० वाजता प्रयागराज येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० ला भुसावळला पोहोचेल. नंतर त्याच दिवशी दुपारी २.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. या गाडीच्या २२ फेऱ्या होतील. पैकी १६ ते २३ फेब्रुवारी आणि ६ ते १३ एप्रिल या कालावधीत अतिरिक्त विशेष ४ फेऱ्या होतील. त्याचप्रमाणे २ ते ३० मार्च कालावधीत होळी विशेष ५ फेऱ्या होतील. २० एप्रिल ते १३ जुलै कालावधीत उन्हाळी विशेष १३ फेऱ्या होतील.

या गाड्यांना कल्याण, इगतपुरी (फक्त 04102 साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबा देण्यात येईल. गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन तसेच सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.
ट्रेन क्रमांक 04102 साठी आरक्षण 14 फेब्रुवारी पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in वर सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट UTS प्रणालीद्वारे उपलब्ध राहील. प्रवाशांना अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपचा उपयोग करता येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या