Friday, February 27, 2026
Homeजळगावभुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

भुसावळ      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि 27
भुसावळ विभागाने अनधिकृत व विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.

दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ विभागात फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. विशेष मोहीम विभागातील एकूण 08 प्रमुख स्थानकांवर यामध्ये भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बदनेरा व अमरावती या स्थानकांचा समावेश होता. प्रवाशांनी नियमांचे पालन करून वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनधिकृत प्रवासास आळा बसावा, मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेत एकूण 55 तिकीट तपासणी कर्मचारी व 09 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेद्वारे एकूण 590 प्रकरणांमधून 3,72,545/- रुपये दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145 अंतर्गत एकूण 09 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून रु. 1,100/- दंड वसूल करण्यात आला.

तसेच स्थानक परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या 04 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करते कि त्यांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा जेणेकरून गैरसोय आणि दंड टाळता येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या